24/09/2026
🙏 गणरायाला निरोप… सेवाभावातून समाजाशी नाते! 🙏
शिरूर नगरपरिषद व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली TOFE Home Food Delivery App यांच्या वतीने गणेश भक्तांसाठी लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मोफत विसर्जन वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात आली. 🚚🌺
गणेश भक्तांची गैरसोय टाळणे, विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या सेवाभावी उपक्रमाची दखल घेत शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार मा. माऊलीआबा कटके यांच्या वतीने TOFE Home Food Delivery App चे सर्वेसर्वा मा. संजय घेगडे सर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, नगरसेवक, पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. 🙏
सेवा हीच खरी श्रद्धा… आणि समाजासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हीच बाप्पाला खरी मानवंदना! ❤️
🌺 गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🌺
TOFE Home Food Delivery — शिरूरचा विश्वास! ❤️