21/09/2026
गणरायाच्या नैवेद्यासाठी झटपट होणारे आणि जिभेवर रेंगाळणारे उकडीचे आंबा मोदक!
उकडीचे मँगो मोदक
साहित्य
सारणासाठी
* ओलं खोबरं (१ नारळ )
* गूळ १७५ ग्रॅ.
* मँगो पल्प १५० ग्रॅ.
* खसखस ५ ग्रं.
* वेलची पूड १५ ग्रॅ.
* खवा २० ग्रॅ
पारीसाठी
* तांदळाची पिठी २०० ग्रॅ.
* पाणी २५० मिली
* मँगो पल्प ५० ग्रॅ
* तूप १५ ग्रॅ.
* मीठ
कृती
सारणाची कृती:
* कढईत तूप घालून, त्यात भाजलेली खसखस आणि ओलं खोबरं घालून परतून घ्या. त्यात गूळ घाला.
* ह्यात खवा आणि वेलची पूड घालावी.
* मिश्रण शिजत आल्यावर मँगो पल्प घालून मिश्रण एकजीव करून घ्या. पूर्ण शिजल्यावर गॅस बंद करुन मिश्रण बाजूला ठेवा.
पारी ची कृती :
* प्रथम कढईत मँगो पल्प घालून २ मिनिट शिजवून घ्या.
* त्यात चवीनुसार मीठ घालावे व तूप घालून एकजीव करून घ्यावे.
* ह्यात पाणी घालून, पाणी उकळू द्यावे.
* उकळत्या पाण्यात तांदळाची पिठी घालून शिजवून घ्या.
* पीठ तयार झाल्यावर गॅस बंद करून मळुन घ्या.
* पारी तयार करुन त्यात सारण भरून मोदक करावे.
* स्टीमर मध्ये पाणी घालून उकळत ठेवावे व तयार मोदक १० ते १५ मिनिट वाफवावे.
* मोदक थोडे गार झाल्यावर बाहेर काढावे आणि तूप घालून सर्व्ह करावे.
[Hotel Shreyas, Your home away from home, Maharashtrian Restaurant, Thali, Ganpati Bappa Morya, naivedya, Bappa cha prasad, Ukdiche modak, mango modak, recipe, try it, easy recipe, sweet, fyp, Pune]