Salim chai Katta

Salim chai Katta It is a famous tea stall in nasik. This place is many of people's gathering point. SALIM MAMU is the owner of this stall.

17/01/2024
This initiative is a joint effort involving the Goda Shraddha Foundation, Nashik Mahanagara Palika, and 11:30 @ salim Wh...
17/12/2023

This initiative is a joint effort involving the Goda Shraddha Foundation, Nashik Mahanagara Palika, and 11:30 @ salim WhatsApp group.

आज "सरला एक कोटी" या चित्रपटाच्या प्रमोशन च्या निमित्ताने चित्रपटातील कलाकार ओंकार भोजने, ईशा केसकर, पिट्या भाई परदेशी उ...
03/01/2023

आज "सरला एक कोटी" या चित्रपटाच्या प्रमोशन च्या निमित्ताने चित्रपटातील कलाकार ओंकार भोजने, ईशा केसकर, पिट्या भाई परदेशी उर्फ रमेश परदेशी व इतर सह कलाकारांनी आपल्या सलीम टी स्टॉल वर चहाचा आस्वाद घेतला...
#नाशिक

25/12/2022

आठवणीतला चहा

24/12/2022

साधारपणे १९७६-७७ ची गोष्ट असेल तेव्हा नाशिकच्या कॉलेजरोडला मुळीच ग्लॅमर नव्हते. किंबहुना हा शहरा बाहेरचा परिसर म...

आठवणीतला चहा....
24/12/2022

आठवणीतला चहा....

 #चहादिनआहेम्हणेआज ❤बेचैनीला फारच उकळी आली की सरळ ती सांडशीनं उचलून चक्क उतरुन ठेवावी. जुन्याच पण लाडक्या आठवणींचा डबा क...
15/12/2022

#चहादिनआहेम्हणेआज ❤

बेचैनीला फारच उकळी आली की सरळ ती सांडशीनं उचलून चक्क उतरुन ठेवावी.

जुन्याच पण लाडक्या आठवणींचा डबा काढावा. संधीप्रकाशाच्या पातेलीमध्ये काळजात सुरु असलेल्या कल्लोळाचं सग्गळं पाणी ओतून घ्यावं. अगदीच दाटसर भावनांची साय तेवढी फुंकर मारुन बाजूला करावी नि गतकाळाच्या लख्ख पांढऱ्या दुधाची डोळे मिटून भर घालावी त्यात. दोन चार आवडती गाणी वेलचीसारखी निवडून घ्यावीत लगोलग बाजूला. आर्त मनाची आच किंचित मंद करावी आणि खिडकीपाशी उभं राहून बाहेरच्या जगाचं वारं नुसतंच बघत राहावं थोडावेळ.

कानांत प्राण आणून ऐकावेत उकळीचे सूर.
त्या आठवणींच्या गडद पानांचं खिदळणं बघावं घडीभर. थोड्यावेळाने आपल्याच चेहऱ्यावर उमटलेली साखर चांगली दोन चमचे टाकून घ्यावी त्यात. अगदी विरघळून जाईपर्यंत थांबायला मात्र हवं हा...

घरभर दरवाळायला लागलं हे वादळ की किंचित ढवळून घ्यावं ते प्रकरण. निग्रहाच्या गाळण्यानं त्यातलाही चोथा बाजूला काढून घ्यावा नि मग कपात गाळून घ्यावं कातरवेळेवर हमखास लागू पडणारं घट्ट, गरम, चवीचवीनं पुन्हा पुन्हा प्यावसं वाटेल असं अमृत.

कलत्या ऊन्हांची गाडी सुटली की...
'बाबा घरातनं बाहेर पडून गेल्यावर वाट्टेल तशी दंगामस्ती करणाऱ्या पोरांसारख्या' या निरवानिरवीच्या वेळेचा आगाऊपणा काही संपायचा नाहीच हो कधी, न बोलावताही संध्याकाळी हटकून फाटकापाशी येऊन तुम्हाला हाक मारणाऱ्या खाष्ट शेजारणीसारखीच हुरहुरसुद्धा यायचीच अहो वाट्याला रोज, आपलंच हे असं का होतं सारखं सारखं वगैरे प्रकारचे प्रश्नही वेळीअवेळी उगवायचेच हो घरातल्या पुरुष माणसांच्या आगंतुक मित्रांसारखे...

मात्र या सगळ्यावरचा उपाय ठाऊक नसल्यासारखं कावरंबावरं व्हायचं नाही आपण उगाचच...कारण कितीही नको वाटत असलं तरी निगुतीनं केलेल्या घोटभर चहातही मणभर ताकद असते.

तेव्हा बेचैनीला फारच उकळी आली की सरळ ती सांडशीनं उचलून चक्क उतरुन ठेवावी.

#कौस्तुभअरुण
© कौस्तुभ अरुण आठल्ये, रत्नागिरी.
४ ऑगस्ट २०२२

Address

Near Shraddha Petrol Pump, College Road
Nashik
422005

Opening Hours

Monday 7am - 7pm
Tuesday 7am - 7pm
Wednesday 7am - 7pm
Thursday 7am - 7pm
Friday 7am - 7pm
Saturday 7am - 7pm
Sunday 7am - 7pm

Telephone

+918805701142

Alerts

Be the first to know and let us send you an email when Salim chai Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category