14/04/2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव आणि कोट्यवधींचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नसून तो समता, न्याय आणि बंधुत्वाचा उत्सव आहे. त्यांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवत आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी जगभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या विशेष दिनानिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांसह प्रियजनांना प्रेरणादायी विचार आणि शुभेच्छा संदेश पाठवा आणि डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करून त्यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा| भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा .
#भीमरावअम्बेडकर #भीमरावअम्बेडकरजयंती