Konkan praant

Konkan praant tour

ओढ म्हणजे काय ते ...गावाला गेल्याशिवाय कळत नाहीआणि गणपतीचा सण म्हणजे काय ते...कोकणात गेल्याशिवाय कळत नाही.🌺गणपती बाप्पा ...
30/08/2022

ओढ म्हणजे काय ते ...
गावाला गेल्याशिवाय कळत नाही
आणि गणपतीचा सण म्हणजे काय ते...
कोकणात गेल्याशिवाय कळत नाही.

🌺गणपती बाप्पा मोरया🌺

 #छत्रपती_शिवाजी_महाराजांची_अस्सल_छायाचित्रे🙏छत्रपति शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील ब...
16/02/2022

#छत्रपती_शिवाजी_महाराजांची_अस्सल_छायाचित्रे🙏

छत्रपति शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत.

आजवर उपलब्ध असलेल्या छत्रपति शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांचा हा घेतलेला मागोवा -

( #डावीकडून_उजवीकडे_चित्र_पहावीत )

1. #मनुची_चित्र_संग्रह - 1672 च्या आसपासचे, मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाह यांची चित्रे मीर महम्मद कडून तयार केली होती.त्यातील हे चित्र आहे. सध्या हे चित्र पॅरिस मध्ये आहे.

2. #किशनगड_चित्रशाळा - हे चित्र किशनगड मध्ये तयार केले असून ते 1750 नंतरचे असावे कारण अशी चित्रे तेथील प्रसिद्ध चित्रकार निहाल चंद ने काढली आहेत. हे चित्र सध्या बॉनहॅम्स कलेक्शन लंडन येथे आहे.

3. #राजपूत_शैली - राजपुती शैलीतील हे चित्र राजस्थान मध्ये काढले गेले असून, 1750 नंतरचे असावे.जगजितसिंह गायकवाड यांचेकडून हे प्राप्त झाले.

4. #रॉबर्ट_ऑर्म_कलेक्शन - हिस्टोरीकल फ्रॅगमेंट्स या ऑर्म च्या पुस्तकात हे चित्र आले आहे, 1782 साली हे पुस्तक आले होते ,हे पेंटिंग 1782 च्या आधीचे आहे.

5. #अश्वारूढ_शिवराय - 1785, 1821,1831 च्या युनिव्हर्स पिक्चरस्क आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात हि चित्र आले आहे.हे चित्र अँटोन झेनेटी ने काढले आहे. चित्राचा काळ 1705-1741 असावा. झेनेटी ने हे चित्र मनुची साठी काढले असण्याची शक्यता आहे. मूळ चित्र कॉपर एनग्रेव्हड असून त्यावर रंगकाम केले आहे.

6. #मुंबईतील_चित्र- हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शन मधील असून 1675 नंतर गोवळकोंडा येथे काढले असावे. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय,मुंबई येथे चित्र सध्या आहे.

7. #फ्रांस_राष्ट्रीय_ग्रंथालय - वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय हे चित्र 1685 सालचे गोवळकोंडा येथील आहे. सध्या फ्रांस मध्ये आहे.

8. #स्मिथ_लेसोफ_कलेक्शन - छत्रपती शिवरायांचे हे उभे असलेले , एका हातात तलवार , दुसर्या हातात पट्टा असलेले चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. हे चित्र १७व्या शतकाच्या शेवटचे असावे.

9. #रिक्स_म्युसियम - डाव्या हातात पट्टा, उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंड मधील असून चित्र 1680 च्या आसपासचे असल्याची तिथे नोंद आहे. चित्रावर 'Siesvage' लिहिलेले आहे.

10. #विटसेन_संग्रह - हे चित्र हॉलंड मधील रिक्स म्युसियम येथे आहे, 1675-1685 हा चित्राचा काळ सांगितला जातो. Siwagii Prince in Decam असे चित्रावर लिहिले आहे.

11. #बर्लिन_जर्मनी - बर्लिन स्टेट लायब्ररी येथे असणारे हे चित्र आहे, या चित्रावर 'Siuwagie gewerzere maratise vorst' असे लिहिले आहे. ज्याचा अर्थ मराठ्यांचा राजा असा होतो. चित्र 1700 च्या पूर्वीचे असून, तत्कालीन भारतातून हॉलंड नंतर तेथून जर्मनी येथे नेले आहे.

12. #गीमे_म्युसियम - पॅरिस फ्रांस येथील मुघल शैलीतील हे शिवरायांचे चित्र आहे. चित्राचे वैशिठ्य म्हणजे या चित्रात त्यांचा पूर्ण चेहरा दिसत आहे.

13. #ब्रिटिश_म्युसियम - लंडन येथे सध्या असणारे शिवाजी महाराजांचे चित्र पोर्टरेट्स ऑफ इंडियन प्रिन्सेस या अल्बम मधील आहे. चित्र गोवळकोंडा येथे बनवले असून काळ 1680 ते 1687 नोंदवला आहे.

14. #फ्रांस्वा_वॅलेंटिन_संग्रह - भिंतीवर हात ठेवलेले हे शिवाजी राजांचे वैशिष्ठयपूर्ण चित्र हे फ्रांस्वा वॅलेंटिन ह्या डच अधिकाराच्या संग्रहातील आहे. चित्र 1782 मध्ये प्रसिद्ध झाले असून ते 1712 च्या आधीचे असावे. चित्रावर 'dwn hee Seva Gi' लिहिले आहे.

15. #लेनिनग्राड - इंडियन मिनिएचर्स या चीत्रसंग्रहात प्रसिध्द झालेले हे चित्र बर्लिन मधील चित्राशी मिळतेजुळते आहे, हे चित्र हॉलंड मधून प्राप्त झाले असून सध्या रशियन लायब्ररीत आहे.

(सर्व चित्रे शिवकालीन व शिवोत्तरकालीन आहेत, इ.स.१८०० नंतरची चित्र विचारात घेतली नाहीत)

#साभार - मालोजीराव जगदाळे

🚩🙏🙏 िजाऊ िवराय ंभुराजे 🙏🙏🚩

अरे नाखवा पाहुण्यांना कोकण  दाखवा...❤️❤️
15/01/2022

अरे नाखवा पाहुण्यांना कोकण दाखवा...❤️❤️

पायरीत विठ्ठला, हे चित्त दंग राहु दे, जीवनात माझ्या या एकदा तरी अभंग होवु दे, येवुनी चंद्रभागेमध्ये एकदा तरी हरी नामाचा ...
15/11/2021

पायरीत विठ्ठला, हे चित्त दंग राहु दे, जीवनात माझ्या या एकदा तरी अभंग होवु दे, येवुनी चंद्रभागेमध्ये एकदा तरी हरी नामाचा गजर एकू दे, मला कुठे ना भेटला तुम्ही, पण हे तुमचे रम्य चित्र माझ्या समोर विठोबा , माझ्या श्वासापर्यंत राहू दे...

जेव्हा निसर्ग व देवत्व एकत्र दिसतात.. मन प्रसन्न होते! जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर ...
07/08/2021

जेव्हा निसर्ग व देवत्व एकत्र दिसतात.. मन प्रसन्न होते!
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर बिर्ला गणपती मंदिर आहे. गणपतीची मूर्ती भव्य आणि दुरून स्पष्ट दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया...!!

भारतात खऱ्या अर्थाने स्त्रीसन्मान राखणारा प्रांत म्हणजे  #कोकण. इथल्या गरिबीतलं हे निखळ हसणं...इथल्या "बा" नं कधी हुंडा ...
18/07/2021

भारतात खऱ्या अर्थाने स्त्रीसन्मान राखणारा प्रांत म्हणजे #कोकण. इथल्या गरिबीतलं हे निखळ हसणं...
इथल्या "बा" नं कधी हुंडा दिला नाही वा घेतला नाही, त्या बापाच्यामूळं हे हसणं... इथल्या मायबापानं सोनोग्राफी करून मुलगी आहे का हे तपासलं नाही, 'ओझ्याचा' गर्भपात केला नाही, आत्महत्या मनातही नाही त्याबदल्यातलं हे हसणं...भंपक दिखाव्यापेक्षा ही लाल मातीच गुलाल समजून उधळत आयुष्याचा उत्सव मांडणाऱ्या ह्या पवित्र भूमीतील, संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लिंगगुणोत्तरात सातत्याने सकारात्मक असलेल्या प्रांतातलं हे 'निखळ हसणं' असंच निरंतर राहो...

Soruce : WhatsApp.🙏

नांव सागा
16/07/2021

नांव सागा

इंग्रजांनी रोवलेला एक वैशिष्ट्यपूर्ण ‌दगड जो मनकांहळ्ळी जिल्हा हासन,कर्नाटक येथे आहेयादगडाच्या उजव्या बाजूला पडलेले पावस...
29/06/2021

इंग्रजांनी रोवलेला एक वैशिष्ट्यपूर्ण ‌दगड जो मनकांहळ्ळी जिल्हा हासन,कर्नाटक येथे आहेया
दगडाच्या उजव्या बाजूला पडलेले पावसाचे पाणी कावेरी नदीतून पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात जाते आणि डाव्या बाजूला पडलेले पावसाचे पाणी नेत्रावती नदीतून पश्चिमेला अरबी समुद्रात वाहत जाते...

*"कोकणातील काजू"*काजू कोकणात आवर्जून मिळणारं खास फळ. आंबा, फणसासोबतच काजू देखील आवडीने खाल्ला जातो. काजू खाल्यामुळे अनेक...
16/06/2021

*"कोकणातील काजू"*

काजू कोकणात आवर्जून मिळणारं खास फळ. आंबा, फणसासोबतच काजू देखील आवडीने खाल्ला जातो. काजू खाल्यामुळे अनेक आजार दूर राहतात. त्यामुळे काजू दररोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत... *काजूचे नियमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात...*

1) *काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी, के चे प्रमाण अधिक असते. तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते. काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं.*

*2) काजूमुळे मेंदूच कार्य अधिक चांगल होतं. त्यामुळे ब्रेन अधिक स्मार्ट करण्यासाठी काजू खाल्लेले अधिक फायदेशीर असतात. काजू खाल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते आणि ग्रास्पिंग पावर देखील वाढते. त्यामुळे लहान मुलांना काजू आवर्जून खायला द्यावेत.*

*3) काजू खाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच काजूत असणाऱ्या एनर्जीमुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तो 100 टक्के कमी होतो आणि कालांतराने नाहीसा होतो.*

*4) डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास रोज सकाळी उपाशीपोटी 4 काजू खावेत आणि त्यावर एक चमचा मध घ्यावं. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो*

*5) नैराश्य आणि डिप्रेशनवर देखील काजू रामबाण उपाय आहे.मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या मुडस्विंग्सच्या वेळी देखील काजू खाल्याने फायदा होतो काजूत आर्यन आणि ओमेगा 3 चे प्रमाण अधिक असल्यामुळे मूड चांगला ठेवण्यात काजू अधिक फायदेशीर आहे.*

*6) काजूमुळे मेंदूतील सिरोटोनिनचं प्रमाण वाढतं, मानसिक स्थिती देखील सुधारते. त्यामुळे मानसिक स्थैर्य खचलेल्या व्यक्तीला आवर्जून काजू खायला दिले जातात.*

*7) काजूत हेल्थी फॅट्सच प्रमाण अधिक आहे. त्यामुळे डायबिटीस, रक्तदाब, लठ्ठपणा यावर काजू फायदेशीर ठरतात. यात प्रोटीन आणि विटामिनचं प्रमाण देखील जास्त आहे. तसेच काजू खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.*

*8) काजू डायबिटीस आणि डायबिटीसपासून जडणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करते.*

*9) काजूतील पोषकतत्वांमुळे पेशीच्या डीएनएचं रक्षण होतं. यामुळे अनेक पेशी निरोगी राहतात. त्यामुळे अधिक आजारांपासून मुक्तता मिळते.*

*10) काजूचं सेवन केल्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरत नाहीत. त्यामुळे लिव्हर कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सारखे आजार आपल्यापासून दूर राहतात.*

*11) अशक्तपणा आला असेल किंवा काहीही काम केल्यास थकल्यासारखं वाटत असेल तर दररोज आपल्याजवळ काजू ठेवावेत...*

19/04/2021
हिवाळा हा दर्दी लोकांसाठी खाण्याचा हक्काचा ऋतू.  बाजारात गेल्यावर निवांत फिरून मी खरेदी करतो. एका ठिकाणी हा टहाळ मिळाला!...
08/01/2020

हिवाळा हा दर्दी लोकांसाठी खाण्याचा हक्काचा ऋतू. बाजारात गेल्यावर निवांत फिरून मी खरेदी करतो. एका ठिकाणी हा टहाळ मिळाला! जरा महागच होता.
अहो हा टहाळ नाही तर डहाळ आहे, असे काही जण म्हणतील. म्हणा.
हरा चना, बूट, छोड़ ही नावेही आहेत याला.
पण हे खाद्य वेड लावणारं आहे.
गड्डीतून ओले हरभरे शोधायचे, ते दाताने फोडून खायचे. याने दात, हाताची बोटं आणि डोळ्याचा चांगला व्यायाम होतो हे एका महान संशोधकाने सांगितले आहेच. ( त्याचे नाव नका विचारू :-D )
हरभरे खायला सुरुवात केली की थांबावे वाटत नाही. पण कुठे तरी थांबलेच पाहिजे.
काही जण नुसतेच हिरवे हरभरे पाव किलो वा अर्धा किलो आणतात घरी. तसे कधीही करू नका. पानांसकट या गड्ड्या घरी आणा.
आपल्या वेळेनुसार कधीही खा. दुपारी चार वाजता. सहा वाजता वा टीव्हीवर बाळूमामा बघता बघता खा.
याने घरात जरा पानांचा कचरा होतो, हे मान्य. गृहिणींनाच तो साफ करावा लागतो. त्यामुळे त्या वैतागतात. यासाठी मग नवरोबा वा मुलींनीही मदत करायला हवी.
या सिझनमध्ये हे हिरवे हरभरे मनसोक्त (म्हणजे पोटाला झेपतील तेवढे) खा.
हिरवा पाला सुकवून एका पिशवीत जमा करत जा.
हिरव्या हरभऱ्याचे दोन तीन पदार्थ मी सांगीनच, पण या सुकलेल्या पानांची जी भाजी बनते तिला तोडच नाही!
ती नंतर याचा सिझन संपत आला की टाकीन!
सौजन्य :- वरील लेख फेसबुक वरून

Address

Konkan
Mumbai
40001

Telephone

7303449783

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan praant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share