Saisha Kitchen

Call Directions

Saisha Kitchen LET'S SPEAK THE LANGUAGE OF GOOD FOOD

Unleash the foodie inside you with hygienically cooked food We serve them fresh.

Please place your order at least two days prior as we don't stock veggies & meat in the fridge.

16/09/2026

गणपती बाप्पा मोरया!

साईशा किचनचा हा सहावा गणेशोत्सव. मन अभिमानाने, आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून आलेलं आहे!❤️

गणपती बाप्पाच्या प्रसादाच्या ऑर्डर्स घेण्याच्या या सहा वर्षांच्या प्रवासाकडे आज मागे वळून पाहताना जाणवतं की, ज्यांनी पहिल्या वर्षी आमच्यावर विश्वास ठेवून ऑर्डर दिली, ते आज, अगदी गेली सहा वर्षं तितक्याच प्रेमाने आणि विश्वासाने आमच्याकडून बाप्पाचा प्रसाद मागवत आहेत. पण त्याहूनही सुंदर गोष्ट म्हणजे, त्यांच्या समाधानातून, त्यांच्या कौतुकातून आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या पोचपावतीतून ‘साईशा किचन’च्या परिवारात दरवर्षी नवी माणसं जोडली जात आहेत. ❤️

यंदा 14 आणि 15 सप्टेंबर रोजी, गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत, आम्हाला सात्त्विक, शास्त्रशुद्ध पद्धतीने, सोवळ्यात बनवलेल्या बाप्पाच्या प्रसादाच्या 450 हून अधिक थाळ्या अगदी वेळेत पोहोचवता आल्या, याचा आनंद शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे. हा केवळ आमच्यासाठी व्यवसाय नाही. ही बाप्पाची सेवा आहे आणि प्रत्येक ताटामागे असलेला आमचा प्रामाणिकपणा, प्रेम आणि आपुलकी आहे.

या सहा वर्षांत एक गोष्ट मात्र मनापासून अनुभवली. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड केली नाही, तर आपले ग्राहकच आपला देव बनून आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात.
त्यांचा विश्वास, त्यांचं प्रेम, त्यांचं कौतुक आणि दरवर्षी पुन्हा आमच्याकडे येणं, हीच आमच्या मेहनतीची खरी कमाई आहे. ❤️🙏🏻

आज ‘साईशा किचन’च्या या परिवारात जेवढी माणसं प्रेमाने जोडली गेली आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्हाला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.

बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना: "जसा आजवर त्याचा कृपाप्रसाद आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला मिळत आलं, तसंच हे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद कायम आमच्यावर राहू दे." 🙏🏻❤️

प्रत्येक ताटात सात्त्विकता, प्रत्येक घासात समाधान आणि प्रत्येक ग्राहकाच्या मनात ‘साईशा किचन’ची आपुलकी कायम राहू दे…

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🌺🙏🏻❤️

टीम Saisha Kitchen

🌹 🌺 गणपती बाप्पा मोरया🌺🌹
14/09/2026

🌹 🌺 गणपती बाप्पा मोरया🌺🌹

Day 1 preparations have begun!🧿 गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻
13/09/2026

Day 1 preparations have begun!🧿

गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻

काही अभिप्राय फक्त कौतुकाचे नसतात… ते आपल्या कामाला मिळालेला आशीर्वाद असतात. “साईशा किचनमुळे अजूनही आम्ही आमची श्रावणी व...
06/09/2026

काही अभिप्राय फक्त कौतुकाचे नसतात… ते आपल्या कामाला मिळालेला आशीर्वाद असतात.

“साईशा किचनमुळे अजूनही आम्ही आमची श्रावणी वार्षिक पूजेची परंपरा सुरू ठेवू शकतो…” ही एक ओळ वाचून मन भरून आलं...

आज कुठेतरी कृतार्थतेची भावना दाटून आली. वाटलं आम्ही फक्त जेवणच देत नाही नाही, तर एखाद्या घराची परंपराही पुढे चालू ठेवण्यात हातभार लावतो. यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं?

साईशा किचन — चवीसोबत जपतोय परंपराही. 🙏🏻💖

17/08/2026

हळदीच्या पानांचा सुगंध, तांदळाच्या पिठाची नाजूक उकड, गुळ-खोबऱ्याचं तुपातलं गोड सारण आणि प्रत्येक पातोळीत जपलेली आपल्या परंपरेची साठवण व घरच्या चवीची आठवण! ❤️

साईशा किचनने आज अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या २२५ पातोळ्यांची ऑर्डर पूर्ण केली!!!

14/08/2026

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!

🙏🏻🇮🇳जय हिंद🇮🇳🙏🏻

🌺*गणपती बाप्पा मोरया*🌺दरवर्षीप्रमाणे यंदा सलग *सहाव्या वर्षी*, श्री गणेशोत्सवासाठी कांदा लसूण विरहित, शास्त्रोक्त पद्धती...
14/08/2026

🌺*गणपती बाप्पा मोरया*🌺

दरवर्षीप्रमाणे यंदा सलग *सहाव्या वर्षी*, श्री गणेशोत्सवासाठी कांदा लसूण विरहित, शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेल्या जेवणाच्या ऑर्डर्सचं बुकिंग सुरू करत आहोत. आपण आपली ऑर्डर *३१ ऑगस्टपर्यंत* नोंदवू शकता. पहिल्या दोन दिवसांचा मेनू खाली प्रमाणे असेल.

१४/०९:
साजूक तूप घालून वरण
भात
वालाची मसाल्याची पातळ भाजी
तोंडली काजू उपकरी
बटाटा भजी
मोदक (प्रत्येकी एक)
सिमला मिरचीचं पंचामृत
कोशिंबीर
चपात्या (प्रत्येकी ३)
चटणी
सोलकढी
लिंबू
👉🏻 एक्स्ट्रा मोदक हवे असल्यास, रुपये ४५/- प्रति नग या दराने मिळेल.

१५/०९:
साजूक तूप घालून वरण
भात
मुगागाठी
फ्लॉवर वाटाणा बटाटा सुकी भाजी
उडदाचे वडे /घारी
शेवयांची खीर
चपात्या (प्रत्येकी ३)
खमंग काकडी
चटणी
ताक
लोणचं
लिंबू

वरील मेनूची, प्रति व्यक्ती किंमत *५६५/- रुपये* असेल. डिलिव्हरी चार्ज अंतरानुसार व वजनानुसार आकारला जाईल. कमीत कमी *पाच पानांची ऑर्डर* स्वीकारली जाईल.

👉🏻 गणपतीच्या पहिल्या दोन्ही दिवसांमध्ये, श्री सत्यनारायणाच्या पूजेसाठी, अगदी पारंपारिक पद्धतीने बनवलेला *प्रसादाचा शिरा* बनवून मिळेल.

👉🏻 गणपतीच्या पहिल्या दिवशी, बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी, संध्याकाळी पाच नंतर *स्नॅक्स पॅकेट्स* देखील मिळतील. एका पॅकेटमध्ये असेल:
२ बटाटे वडे
१ खमण ढोकळा
१ साजूक तुपातला ड्राय फ्रूट लाडू

या एका पॅकेटची किंमत असेल *रुपये १००/-* फक्त. कमीत कमी *दहा पॅकेट्स* ची ऑर्डर द्यावी लागेल. डिलिव्हरी चार्ज अतिरिक्त.

ऑर्डर जास्त झाल्यास, *गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून*, ३१ ऑगस्टच्या आधीच ऑर्डर नोंदणी बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घेण्यात यावी. 🙏🏻

*साईशा किचन*
9022716976


Feel free to contact SAISHA KITCHEN for daily veg & non veg tiffins.
03/08/2026

Feel free to contact SAISHA KITCHEN for daily veg & non veg tiffins.

अन्नपूर्णे सदापूर्णेशंकर प्राणवल्लभे।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थंभिक्षां देहि च पार्वति॥🙏🏻🇮🇳जय हिंद🇮🇳🙏🏻
25/07/2026

अन्नपूर्णे सदापूर्णे
शंकर प्राणवल्लभे।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं
भिक्षां देहि च पार्वति॥

🙏🏻🇮🇳जय हिंद🇮🇳🙏🏻

शनिवार २५ जुलै रोजी असणार्‍या *आषाढी एकादशी* निमित्त, साईशा किचन घेऊन येत आहे खास *उपवास कॉंबो*. या कॉंबोमध्ये असेल: 👉🏻 ...
21/07/2026

शनिवार २५ जुलै रोजी असणार्‍या *आषाढी एकादशी* निमित्त, साईशा किचन घेऊन येत आहे खास *उपवास कॉंबो*. या कॉंबोमध्ये असेल:
👉🏻 २ फराळी पॅटीस व चटणी
👉🏻 उपवासाची ड्राय फ्रूट खीर
👉🏻 साबुदाणा खिचडी
👉🏻 रताळ्याची भाजी
👉🏻 दही

या उपवास कॉंबोची किंमत असेल ४५०/- रुपये फक्त. *डिलीव्हरी चार्ज अतिरिक्त*

या उपवास कॉंबोच्या ऑर्डर्स, *२३ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच* स्वीकारल्या जातील.

Address

Near Big Bazzar, Matunga West
Mumbai
400016

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919022716976

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saisha Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share