25/01/2021
कॅफे या प्रकारच्या खाद्यगृहाचा एक स्वतःचा चाहता वर्ग आहे. नुसती कॉफी अन कुकीज मिळणार्या जागांपासून ते कॉफीचे शंभर प्रकार, सँडविच, पिज्झाचे चाळीस प्रकार
कॅफे आणि थीम रेस्टॉरंट या प्रकारात व्यावसायिक म्हणून नसला तरी ग्राहक म्हणून बराच अनुभव गाठीशी आहे. आपल्यातल्या अनेकांच्या असेल. आपलं स्वतःचंही एक कॅफे कॉलेजच्या कॉर्नरवर, बीचवर, मैदानाशेजारी किंवा कुठेतरी असावं अशी इच्छा अनेकांना असते. मला तरी नक्की अनेकदा अशी सुप्त इच्छा जाणवली आहे.
ते जाऊ दे. पण ग्राहक म्हणूनसुद्धा कॅफेचा जास्तीतजास्त उत्कृष्ट आणि लक्षात राहण्यासारखा, लाँग टर्म कस्टमरशिप तयार करणारा अनुभव बर्याच ठिकाणी येतो.. आणि त्याहून जास्त ठिकाणी कॅफेचे प्रयोग फसलेले दिसतात. काहीतरी नकोसं जाणवतं. अनुभवात मिठाचा खडा पडतो. चव हा सर्वात महत्वाचा मुद्दा हे सर्वच जाणतात. पण खरंच तसं असतं का? निव्वळ थंड साठवलेले रॅपरमधले पदार्थ देणारं मोठ्या ब्रँडचं कॅफे त्याच्या अँबियन्समुळे चांगलं चाललेलं दिसतं. आणि खूप खर्चिक थीम्स बनवूनही काही ठिकाणी बसण्याची रचना, लोकेशन, पदार्थांचा चॉईस, सर्व्हिसला लागणारा वेळ, निवांतपणा, या सर्व गोष्टींचे आपल्या मनात आपोआप पॉईंट्स जमा होत राहतात. त्यासाठी आम्ही आपल्या अस्सल बारामती मधील खवय्यांना खुश करण्यासाठी आम्ही काहीतरी नवीन सुरू करत आहोत यात एकाच ठिकाणी तुम्ही तुमचा वाढदिवस असो किंवा आनंदाचा क्षण उत्कृष्ट केक तसेस खाद्यपदार्थ सोबत साजरे करू शकता तर उद्या पासून या आम्ही तुमची वाट पाहतोय
Amit Deshpande
Bharat Dalavi
कॅफे सेव्हन
पत्ता :- 7th हेवन केक शॉप शेजारी सुभद्रा मॉल Midc बारामती
https://maps.app.goo.gl/JgqmzUMhCMsZz27X6